Ad will apear here
Next
जीएसटी जनजागृतीसाठी ‘एक्झॅक्ट’
जीएसटी जनजागृतीच्या उपक्रमाचा शुभारंभ करताना
मुंबई : एक्सेलॉन सॉफ्टवेअरचे निर्माता असलेले एक्झॅक्ट हे भारतातील अग्रगण्य जीएसटी सोल्यूशन आणि जीओआय परवानाप्राप्त जीएसपी (जीएसटी सुविधा पुरवठादार) आहेत. नवीन जीएसटी प्रणाली व्यवसायांसाठी सुसह्य असावी, या उद्देशाने बुधवारी, तीन मे रोजी जनजागृती उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. जीएसटी अंमलबजावणीबाबत ग्राहक, व्यावसायिक, सरकार आणि सेवा पुरवठादार यांच्यात असलेला संभ्रम लक्षात घेऊन कंपनीने एक्झॅक्ट हे ‘क्लाउड’आधारित जीएसटी सॉफ्टवेअर सादर केले असून, त्यामुळे व्यवसायाला जीएसटी कररचनेकडे स्थलांतरित होण्यासाठी मदत होईल. 

माध्यमांशी बोलताना ‘एक्सेलॉन सॉफ्टवेअर’चे संस्थापक आणि अध्यक्ष विनोद तंबी म्हणाले, ‘भारतीय अर्थव्यवस्थेकरिता जीएसटी हा केवळ गेमचेंजर ठरणार नाही. याची अंमलबजावणी आणि पूर्तता हे एकदाच निर्माण होणारे आव्हान आहे. प्रामुख्याने जे व्यवसाय जुन्या, गुंतागुंतीच्या कररचनेचा अंगीकार करतात, त्यांच्यासाठी ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीबाबत बाजारात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत याची जाणीव आम्हाला झाली. ‘जीएसटी’विषयीची साशंकता आणि आपण त्याचे व्यवस्थापन कसे करावे, हाच या उपक्रमाचा गाभा आहे.’

‘एक्सेलॉन’ने ‘एक्झॅक्ट’ हे क्लाउड-आधारित जीएसटी सोल्यूशन सादर केले हे लक्षणीय आहे. त्यामुळे व्यापारात गुंतागुंतमुक्त जीएसटी लागू होण्यास हातभार लागेल. जीएसटी सुविधा पुरवठादार (जीएसपी) म्हणून ‘एक्सेलॉन’चे ‘एक्झॅक्ट’ करदात्यांसाठी कल्पक पद्धती पुरवेल. अगदी अंतिम टोकापर्यंतची समस्या जीएसटी यंत्रणेसोबत संवादाच्या साह्याने सोडवणे शक्य होईल. एका सुरक्षित यंत्रणेच्या माध्यमातून जीएसटी यंत्रणा करदात्यांसाठी त्यांच्या सोयीनुसार उपलब्ध असेल. शिवाय ही यंत्रणा ऑल युजर्स इंटरफेस समावेशक असेल.

‘जीएसटीच्या गुंतागुंतीवर सर्वसमावेशक मात्र सोप्या पर्यायाची आवश्यकता होती. ‘एक्सेलॉन’ने ती उणीव भरून काढली. आम्ही अधिकाधिक मजबूत,  विश्वासार्ह आणि जबाबदार असे जीएसपी सोल्युशन तयार केले आहे, ज्यामुळे व्यवसायांना जीएसटीकडे वळणे सोयीचे होईल,’ असे तंबी म्हणाले. 
कंपन्यांना आपल्या कराचे व्यवस्थापन पद्धतशीर करायला मदत व्हावी या उद्देशाने ‘एक्झॅक्ट’चे डिझाइन करण्यात आले आहे. हे सॉफ्टवेअर कंपनीच्या सध्याच्या ओईएम-ईआरपी सोबत जोडले जाईल, ज्यामुळे नोंदणीकरण, कर भरणा, रिटर्न फाइल करणे व इतर माहितीचे आदान-प्रदान या महत्त्वाच्या जीएसटी यंत्रणेने शक्य होईल. कंपन्यांना ‘एक्झॅक्ट’वर मिळणारा लाभ म्हणजे कमीतकमी वेळात आणि प्रयत्नात कर भरणा, बिलाची माहिती सुलभरीत्या अपलोड करणे, खरेदी माहिती पडताळून पाहणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जीएसटीसंबंधित सर्व सेवांसाठी सिंगल स्टॉप शॉप!
हे सॉफ्टवेअर नॉन-मल्टीटेनंट सोबत संपूर्ण डेटा सिक्युरिटी पुरवते आणि यामध्ये स्वयंचलित डेटा मॉंनिटरिंगची सोय आहे.  

संसदेत अलीकडेच जीएसटीला हिरवा कंदील मिळाला व एक जुलै २०१७पासून जीएसटीची अमलबजावणी होईल. त्यामुळे देशात सर्वांत मोठी करसुधारणा होणार आहे. याचा परिणाम केंद्र आणि राज्य सरकार, ग्राहक, छोटे-मोठे व्यापारी आणि सेवा पुरवठादार क्षेत्रांमध्ये दिसेल. जीएसटीमुळे व्यवहारांचे मूल्य भरपूर कमी होईल. तसेच निर्मिती क्षेत्रात करविषयक सुलभता येईल. त्यामुळे दीर्घकाळ सोप्या पद्धतीने व्यापार-उद्योग करणे शक्य होणार आहे. या संदर्भातील अंमलबजावणीतील अडथळे दूर ठेवले तर निर्मिती क्षेत्र प्रभावशाली होईल आणि दीर्घकाळ सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढत राहील, अशी अपेक्षा आहे   

आता या अंमलबजावणीकरिता दोनच महिने हातात आहेत, याविषयी ग्राहक, निर्माते आणि सेवा पुरवठादार यांच्यात असलेला संभ्रम आणि त्यांना जाणवणारी समस्या हाच चर्चेचा मुद्दा झाला आहे. परंतु, एक्सेलॉन सॉफ्टवेअरसारख्या कंपन्यांमुळे आपला देश सर्वांत मोठ्या परिवर्तनाचा साक्षीदार होण्यास सज्ज झाला आहे.

एक्सेलॉन सॉफ्टवेअरविषयी 
नागपूर येथील एक्सेलॉन सॉफ्टवेअर यांचे आणखी एक कार्यालय पुण्यात असून, २०००मध्ये स्थापनेपासून कंपनी अत्याधुनिक आणि वापरण्यास सुलभ, विक्री, वितरण आणि सेवा व्यवस्थापन सॉफ्टवेअरसाठी प्रसिद्ध आहे. ‘एक्सेलॉन’चे संशोधन अत्याधुनिकतेला वाव देणारे असल्याने उद्योग-व्यापारात जाणवणाऱ्या समस्यांसाठी व ग्राहकांकरिता क्लाउड, मोबिलिटी आणि विश्लेषणात्मक कल्पक पर्याय (सोल्युशन्स) तयार केले जातात. एक्सेलॉन सॉफ्टवेअरची उत्पादने जगभरातील आठ हजार ५०० ठिकाणी ३० हजारांपेक्षा अधिक ग्राहक वापरतात. या कंपनीची भारत आणि जगातील ब्ल्यू चीप कंपन्यांसोबत भागीदारी असल्याने त्यांना विक्री, वितरण आणि सेवा संपर्क जाळ्यात परिवर्तन आणणे शक्य होते. त्यांना मिळालेले पुरस्कार आणि प्रशंसा ही त्यांच्या कार्यक्षेत्रातील बांधिलकी, मेहनत आणि प्रभावीपणाची पावती आहे.

एक्झॅक्ट हा एक्सेलॉन सॉफ्टवेअरचा सब-ब्रँड आहे. त्याने व्यवसायांकरिता गुंतागुंतमुक्त जीएसटी साह्य पुरवण्याचे एककलमी उद्दिष्ट निर्माण केले. एक्सेलॉन सॉफ्टवेअरचे एक्झॅक्ट जीएसपी सोल्युशन एक जीएसटी सुविधा पुरवठादार (जीएसपी) या भूमिकेतून जीएसटी यंत्रणा करदात्यांसाठी त्यांच्या सोयीनुसार उपलब्ध करून देईल. शिवाय ही यंत्रणा ऑल युजर्स इंटरफेस समावेशक असेल. ती सुरक्षितरीत्या जीएसटी सिस्टीम एपीआयसोबत जोडली जाईल. 
एक्सेलॉन सॉफ्टवेअर मजबूत, प्रभावी आणि उत्स्फूर्त कल्पक साधने (टूल्स) व मंच (प्लॅटफॉर्म) उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यांची अत्याधुनिक व व्यवहारक्षम उत्पादने आणि सेवा कंपनीला अधिकाधिक कार्यशील, पारदर्शक आणि नफा कमावणारी बनवतात. 
अधिक माहितीसाठी संपर्क:  
आरिफ मलिक : ९८३३९ ३४००२ 
ई-मेल : aarif@conceptpr.com
नेहा सिंग : ७६६६७ ४७६०२
ई-मेल: neha@conceptpr.com 
वेबसाइट : www.excellonsoft.com
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZUGBC
Similar Posts
मुंबईत ३१ जानेवारीला शेतकरी साहित्य संमेलन नागपूर : शेती अर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणीवा समृद्ध करण्यासाठी आणि मराठी साहित्य क्षेत्राकडून कृषीजगताला असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी चौथे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक, कवी डॉ. विठ्ठल वाघ भूषविणार आहेत.
‘क्लिअरटॅक्स’द्वारे ‘जीएसटीआर-९’ सॉफ्टवेअर सादर मुंबई : भारताच्या आघाडीच्या टॅक्स, जीएसटी अनुपालन आणि म्युच्युअल फंड गुंतवणूकीत अग्रेसर ‘क्लिअरटॅक्स’तर्फे ‘जीएसटीआर-९ फायलिंग’ सॉफ्टवेअर सादर केले आहे. हे सॉफ्टवेअर सनदी लेखापाल (सीए) तसेच व्यावसायिकांना कोणत्याही अडचणीशिवाय ‘जीएसटीआर-९’ भरण्यासाठी मदत करणार आहे.
‘गोदरेज’तर्फे ग्राहकांना जीएसटी कपातीचा लाभ मुंबई : गोदरेज रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, ekbØksoso vksoul आणि चेस्ट फ्रीजर्झ या उपकरणांवरील जीएसटी दर नुकताच २८ टक्क्यांवरून कमी होऊन १८ टक्क्यांवर आल्याने गोदरेज अप्लायन्सेस ही भारतातील गृहोपयोगी उपकरणे क्षेत्रातील आघाडीची कंपनी १० टक्के कपातीचा फायदा ग्राहकांना करून देणार आहे. या उपकरणांच्या किंमती
‘क्लिअरटॅक्स’तर्फे ‘जीएसटी हेल्थ चेक कंप्लायन्स टूल’ सादर मुंबई : ‘क्लिअरटॅक्स’ या टॅक्स, फायनॅन्स आणि अनुपालन सोल्युशन पुरवठादार कंपनीतर्फे ‘जीएसटी हेल्थ चेक’ हे नवीन टूल सादर करण्यात आले आहे. हे टूल एखाद्या व्यवसायाच्या जीएसटी हेल्थचा तपशीलवार रिपोर्ट काढून त्या व्यवसायाला डेटाचा आधार असलेली जीएसटीविषयक माहिती देते. अचूक इनपुट टॅक्स क्रेडिटच्या दाव्यासाठी,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language